Paithan Dharan /Jayakwadi Dam- पैठण धरण 100% -सर्वांना आनंदाची बातमी

Paithan Dharan / Nathsagar Dharan / Jayakwadi Dam – धरणा विषयी

 धरणा विषयी Jayakwadi Dam ज्याला नाथसागर या नावानेही ओळखले जाते. जायकवाडी धरण हे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील जायकवाडी गावाच्या ठिकाणी गोदावरी नदीवर असलेले मातीचे धरण आहे.  पैठण धरण जायकवाडी  धरण /  नाथसागर हे आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण अशी ओळख आहे. जायकवाडी धरण हा गोदावरी खोऱ्यातील गोदावरी नदीवर बांधलेला एक मोठा प्रकल्प आहे.

हे धरण छत्रपती संभाजीनगर जिल्यात असून मराठवाड्यातील तब्बल पाच जिल्ह्यांना पाणी पुरवणारे एकमेव धरण असून त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर , जालना , बीड परभणी आणि नांदेड यांचा समावेश आहे.

paithan dharan

 

 

 

 

 

 

Paithan Dharan / Jayakwadi Dam – पाणी साठा

सर्वांना आनंदाची बातमी आज दिनांक 18  सप्टेंबर  2024 पर्यंत पाणी साठा 99.44% इतका आहे तसेच जलसंपदा विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार जायकवाडी धरणामध्ये हळूहळू पाणीसाठा वाढतोय.

 

भारत स्वतंत्र झाल्यापासून हे धरण 20 वेळा  100% भरले आहे. 

स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार मागच्या ७५ वर्षात हे धरण 20 वेळा  100% भरले आहे.

पैठण चा हा छोटा समुद्र भारत स्वतंत्र झाल्यापासून 20 वेळा  100% भरला आहे.  हे धरण पूर्ण भरल्याने सर्वांना आनंद झाला असून शेतकरी वर्ग व औद्योगिक विभागात आनंदाचे वातावरण आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा, पैठण, बिडकीन आणि जालना औद्योगिक वसाहतीसुद्धा याच धरणावर अवलंबून आहेत.

जायकवाडी धरण – विशेष माहिती… 

धरण 100% भरले, पाण्याचा विसर्ग सुरु

Paithan Dharan / पैठण धरण 100%  भरले असून धरणाचे सर्व 27 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदी काठच्या लोकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे.

या धरणावर दोन कालवे आहेत उजवा व डावा. उजव्या कालव्याची लांबी 132 KM  असून उजवा कालव्याचे पाणी  अहमदनगर व बीड जिल्ह्यामध्ये जाते व डाव्या कालव्याची लांबी 208 KM असून याचे पाणी छत्रपती संभाजीनगर जिल्हा, जालना व परभणी  जिल्हा या साठी जाते याच कालव्यांद्वारे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अहमदनगर आणि परभणी जिल्ह्यांतील 237,452 हेक्टर शेती क्षेत्राला सिंचन करते.

Paithan Dharan / Jayakwadi पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी
Paithan Dharan / Jayakwadi पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी

 

 

 

 

Leave a Comment