LADKI BAHIN YOJNA – पात्र लाभार्थी यादी जाहीर येथे शोधा तुमचे नाव

LADKI BAHIN YOJNA – लाभार्थी यादीमध्ये असे शोधा आपले नाव

LADKI BAHIN YOJNA लाभार्थी यादीमध्ये नाव आले आहे की नाही हे तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने जाणून घेता येणार आहे. ज्या महिलांनी योजनेंतर्गत 31 जुलै पर्यंत अर्ज केले आहेत त्यातील पात्र महिलांची यादी प्रकाशित करण्यात आली आहे . या योजनेशी संबंधित आपण आपल्या अर्जांची स्थिती तपासू शकतात. योजनेच्या लाभार्थींनी यादीतील त्यांचे नाव तपासण्यासाठी या स्टेप्स वापरा.

1. सर्वप्रथम फोनवर प्ले स्टोअरवरून ‘नारी शक्ती दूत’( Narishakti Doot App ) ॲप डाऊनलोड करावे.

2. नारी शक्ती दूत’( Narishakti Doot ) ॲप डाऊनलोड झाल्यानंतर त्या अँप ला ओपन करा.

3. आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करा आणि लॉगिन बटण वर क्लिक करा.

4.आपल्या नंबर वर 1 ओटीपी पासवर्ड येईल तो टाका.

5. लॉग इन झाल्या नंतर मुख्यपृष्ठावर – केलेले अर्ज हा पर्याय निवडा.

6. येथे तुम्हाला लाभार्थी यादी पाहण्याचा पर्याय सापडेल.

Ladki Bahin Yojna
Ladki Bahin Yojna

स्क्रीनशॉट फोटोंचा आधार घेऊन आपण अँप कसे वापरायचे  त्याचा अंदाज घेऊ शकता.

LADKI BAHIN YOJNA पैसे महिलांच्या बँक खात्यात कधी जमा होणार?

माझी लाडकी बहीण या योजने अंतर्गत सर्व पात्र बहिणींना रक्षाबंधनाच्या 2 दिवस आधी 17 ऑगस्ट 2024 रोजी आपल्या खात्यात DBT द्वारे पहिले 2 हफ्त्यांची रक्कम  एक सोबत जमा होणार आहे.

LADKI BAHIN YOJNA अंतिम मुदत

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी  31 ऑगस्टपर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे. 31 ऑगस्टनंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे

LADKI BAHIN YOJNA योजनेबद्दल

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने 28 जून 2024 रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रु. 1500/- असा आर्थिक लाभ DBT द्वारे देण्यात येणार आहे.

LADKI BAHIN YOJNA पात्रता अटी

पात्रता अटी तपशील
1. महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील स्थायी रहिवासी असणे आवश्यक आहे.
2. महिलांचे प्रकार विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता, निराधार आणि कुटुंबातील एक अविवाहित महिला.
3. वयोमर्यादा किमान २१ वर्षे पूर्ण, कमाल वय ६५ वर्षे.
4. बँक खाते आधार लिंक केलेले बँक खाते असणे आवश्यक आहे.
5. वार्षिक उत्पन्न लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.

 

LADKI BAHIN YOJNA – आवश्यक कागदपत्रे

१. आधार कार्ड अर्जामध्ये आधारकार्ड प्रमाणे नाव नमुद करावे

२. अधिवास प्रमाणपत्र प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे (१५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड/१५ वर्षा पूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला) यापैकी कोणतेही एक.

३. महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे (१५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड / १५ वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला/अधिवास प्रमाणपत्र) यापैकी कोणतेही एक.

४. वार्षिक उत्पन्न – रु. २.५० लाखापेक्षा कमी असणे आवश्यक

अ) पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.

ब) शुभ्र शिधापत्रिका असल्यास अथवा कोणतीही शिधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापर्यंत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.

५. नवविवाहितेच्या बाबतीत

रेशानकार्डवर तिच्या नावाची नोंद नसल्यास विवाह प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहितेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य राहील.

६. बँक खाते तपशील (खाते आधार सोबत लिंक असावे)

७. लाभार्थी महिलेचे हमीपत्र व फोटो

 

LADKI BAHIN YOJNA
या योजनेचा उद्देश मुलींना शिक्षण, आरोग्य, आणि आर्थिक स्थिरता यासाठी प्रोत्साहन देणे आहे.

Leave a Comment