मुलींना मोफत शिक्षण योजना 2024 – असा करा ऑनलाईन अर्ज आणि भरलेली फीस मिळवा परत

1. मुलींना मोफत शिक्षण 2024 योजनेविषयी

मुलींना मोफत शिक्षण योजना 2024 हि नवीन शैक्षणिक धोरणानुसार (NEP) व्यवसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढवण्याच्या दृष्ट्टीने व मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हाव्या, तसेच महिला  सक्षमीकरणांतगबत आर्थिक पाठबळाअभावी व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नयेत म्हणून महाराष्ट्र सरकारने  सुरु केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने 05/07/2024 एक सरकारी ठराव (GR) जारी करून या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 906 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.मुलींना-मोफत-शिक्षण-योजना-2024

i. महाराष्ट्र सरकारचा मुलींना मोफत शिक्षण देण्याचा उद्देश

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महिला शिक्षणाला चालना देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचा निर्णय घेण्यात आला. महिला विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि परीक्षा शुल्क माफ केले जाईल.
  • राज्यातील मुलींना शिक्षणात प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून मोफत शिक्षण योजना लागू करण्यात आली आहे. त्यानुसार वार्षिक आठ लाख रुपये किंवा कमी उत्पन्न असलेल्या पालकांच्या मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार  व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढविण्यासाठी, मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी मिळण्यासाठी, महिला सक्षमीकरणाअंतर्गत आर्थिक पाठबळाऐवजी, मुली व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यापासून वंचित राहू नयेत यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या ५ जुलै रोजी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता.

ii. मुलींच्या मोफत शिक्षणासाठी पात्रता

महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबातील मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या मुलींना मोफत शिक्षण योजना 2024 साठी शासनाने काही पात्रता निकष निश्चित केले आहेत, ज्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

  • या योजनेसाठी केवळ महाराष्ट्र राज्यातील कायमस्वरूपी रहिवासी असणे गरजेचे आहे.
  • या योजनेसाठी केवळ महाराष्ट्र राज्यातील कायमस्वरूपी रहिवासी असणे गरजेचे आहे.
  • ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 08 लाखांपेक्षा कमी आहे त्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल
  • ज्या मुलींच्या कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी किंवा आयकरदाते आहेत अशा मुली या योजनेचा लाभ घेण्यास पात्र नाहीत.
  • अर्ज करण्यासाठी मुलींकडे सर्व आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
  • ज्या विद्यार्थिनी नोकरी करत असतील, त्यांच्या आई-वडील यांच्या  उत्पन्नासोबत विद्यार्थिनी चे उत्पन्न हे 08 लाखांपेक्षा कमी आहे त्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल

2. मुलींना मोफत शिक्षण 2024 शासन निर्णय (GR) 

इंजिनीयरिंग, मेडीकल, तंत्रशिक्षण सारख्या न परवडणाऱ्या, खर्चिक शिक्षणा सोबत एकूण 800 + कोर्स मध्ये मुलींना मोफत शिक्षण मिळणार आहे. या संबंधी अधिकृत घोषणा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

उच्च व तंत्रशिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण तसेच औषधी द्रव्ये विभाग, कृषी व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभाग यांच्या अखत्यारितील शिक्षण संस्थांमध्ये राबवल्या जाणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

ही योजना केवळ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीच लागू असून, कला, वाणिज्य, विज्ञान इ. पारंपारीक शाखांतील अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही.

योजनेचे नाव

मुलींना मोफत शिक्षण योजना 2024

राज्य

महाराष्ट्र सरकार

GR दिनांक

05/07/2024

घोषणा

उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

कोर्स समाविष्ट

मेडिकल, तंत्रशिक्षण, इंजिनियरिंग सारख्या ८००+ कोर्स मध्ये मोफत शिक्षण घेण्याची संधी.

पात्रता

महाराष्ट्रातील मुलींच्या विद्यार्थ्यांना, वार्षिक कुटुंब उत्पन्न रु.8.00 लाखापेक्षा कमी असणे गरजेचे

लाभार्थी

सुमारे 20 लाख मुली

संस्थांचे समावेश

सरकारी, सहाय्यक खाजगी, अर्ध-सहाय्यक खाजगी, गैर-सहाय्यक महाविद्यालये, पॉलिटेक्निक इ.

वार्षिक खर्च

₹906.05 कोटी

आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा, उत्पन्न प्रमाणपत्र, मागील वर्गाचे मार्कशिट, टीसी, इ.

उद्देश

गरीब कुटुंबातील मुलींना मोफत उच्च शिक्षण देणे

आधिकारिक वेबसाइट

maharashtra.gov.in

GR – मुलींना मोफत शिक्षण योजना 2024  डाउनलोड करण्यासाठी  येथे क्लिक करा  

 

i. मुलींना मोफत शिक्षण योजना 2024 आवश्यक कागदपत्रे

मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत.

  1. अर्जदार मुलीचे आधार कार्ड.
  2. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र/ दाखला.
  3. रहिवासी प्रमाणपत्र / डोमासाइल प्रमाणपत्र.
  4. शाळा सोडल्याचा दाखला (TC).
  5. मागील वर्षाचे गुणपत्रक/मार्कशीट.
  6. मुलीचा पासपोर्ट साईज फोटो.

ii. मुलींना मोफत शिक्षण 2024 ऑनलाईन अर्जप्रक्रिया

मुलीना मोफत शिक्षण या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने नुकतेच ऑनलाईन पोर्टल सुरु केले आहे. सर्व पात्र मुलींनी या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन सरकारने केले आहे

मुलींना मोफत उच्च शिक्षण योजनेसाठी महाडीबीटी पोर्टल सुरु केले आहे. तिथे ऑनलाईन अर्ज सबमिट करायचा आहे.

महाडीबीटी पोर्टल ऑनलाईन अर्ज येथे करा : https://mahadbt.maharashtra.gov.in

3. हेल्पलाईन नंबर & Email

मुलींना मोफत शिक्षण या योजनेचा लाभ घेताना विद्यार्थिनींना काही अडचणी आल्यास त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी उच्च शिक्षण विभागाने हेल्पलाईन नंबर  आणि हेल्प डेस्क सुरू केला आहे. ही हेल्पलाईन 0796134440, 07969134441 या क्रमांकावर आणि helpdesk.maharashtracet.org यावर संपर्क करावा. जर आपण भरलेली फीस वापस मिळत नसेल तर आपण रीतसर वरील हेल्पलाईन वर तक्रार करू शकत।.

2 thoughts on “मुलींना मोफत शिक्षण योजना 2024 – असा करा ऑनलाईन अर्ज आणि भरलेली फीस मिळवा परत”

Leave a Comment