Paithan Dharan / JAYAKWADI DAM – महाराष्ट्राचा छोटा समुद्र, 5 जिल्ह्यांना पाणी पुरवणारे एकमेव मातीचे धरण

Paithan Dharan / Jayakwadi Dam – नाथसागर धरणा विषयी

Jayakwadi Dam ज्याला नाथसागर या नावानेही ओळखले जाते. जायकवाडी धरण हे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील जायकवाडी गावाच्या ठिकाणी गोदावरी नदीवर असलेले मातीचे धरण आहे. जायकवाडी  धरण /  नाथसागर हे आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण अशी ओळख आहे. जायकवाडी धरण हा गोदावरी खोऱ्यातील गोदावरी नदीवर बांधलेला एक मोठा प्रकल्प आहे. मराठवाड्यातील तब्बल पाच जिल्ह्यांना पाणी पुरवणारे एकमेव धरण असून त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर , जालना , बीड परभणी आणि नांदेड यांचा समावेश आहे.

Jayakwadi Dam

Paithan Dharan / Jayakwadi Dam – पाणी साठा

जलसंपदा विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार जायकवाडी धारणामध्ये हळूहळू पाणीसाठा वाढतोय. आज दिनांक 17 सप्टेंबर  2024 पर्यंत पाणी साठा 99.33% इतका आहे.

स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार मागच्या ७५ वर्षात हे धरण 20 वेळा  100% भरले आहे.

पैठण चा हा छोटा समुद्र भारत स्वतंत्र झाल्यापासून 20 वेळा  100% भरला आहे आणि या वर्षीही हा समुद्र पूर्ण भरला असून सगळे म्हणजेच 12 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Paithan Dharan / Jayakwadi Dam – लांबी, उंची आणि व्याप्ती

जायकवाडी धरण हे आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण आहे. त्याची  लांबी सुमारे 60 KM ( 60000 M , 196850 ft )  रुंदी 10 KM ( 9997.67 M , 32801 ft ) आणि उंची सुमारे 0.04 KM ( 41.30 मीटर (135.5 फूट)  असून एकूण साठवण क्षमता 2,909 KM3  दशलक्ष घनमीटर आहे. धरणाचे एकूण पाणलोट क्षेत्र 21,750 KM2  (8398 चौरस मैल) आहे. या धरणाला पाण्याचे 12.50 x 7.90 M चे 27 दरवाजे आहेत जायकवाडी धरण हे  89000 एक्कर वर पसरलेले आहे.  अशी प्रचंड व्याप्ती असल्या कारणाने या धरणाला महाराष्ट्राचा छोटा समुद्र असे संबोधले जाते.

जायकवाडी / नाथसागर
धरणाचा उद्देश  सिंचन आणि औद्योगिकरण
धरण कोणत्या नदीवर आहे   गोदावरी नदी
स्थान  पैठण, छत्रपती संभाजीनगर
लांबी  60000   मी / 196850 फूट
उंची  41.3 मी. /   135.5 फूट
रुंदी  9997.67 मी. / 32801 फूट
बांधकाम सुरू  इ.स. 1965
उद्घाटन दिनांक  इ.स. 1976
ओलिताखालील क्षेत्रफळ  35000 हेक्टर

सिंचन पद्धत

जायकवाडी धरणाचे पाणी प्रमुखाने शेतजमिनीला सिंचनासाठी वापरले जाते. जायकवाडी प्रकल्प हा महाराष्ट्रातील मराठवाड्याचा  सर्वात मोठ्या सिंचन प्रकल्प आहे. या धरणावर दोन कालवे आहेत उजवा व डावा. उजव्या कालव्याची लांबी 132 KM  असून उजवा कालव्याचे पाणी  अहमदनगर व बीड जिल्ह्यामध्ये जाते व डाव्या कालव्याची लांबी 208 KM असून याचे पाणी छत्रपती संभाजीनगर जिल्हा, जालना व परभणी  जिल्हा या साठी जाते याच कालव्यांद्वारे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अहमदनगर आणि परभणी जिल्ह्यांतील 237,452 हेक्टर शेती क्षेत्राला सिंचन करते.

Jayakwadi Dam – ख्याती आणि क्षमता

हे धरण एकदा पूर्ण भरलं तर दोन वर्षाच्या शेतीच्या पाण्याची आणि ४ वर्षांच्या पिण्याची पाण्याची सोय होते। म्हणून या धरणाला महाराष्ट्राचा आणि  मराठवाड्याचा छोटा समुद्र समजला जातो. धरण बगायला गेल्यानंतर सगळीकडे पाणीच पाणी दिसते। जेव्हा जेव्हा हे धारण मृतसाट्यात जाते. तेव्हा सुद्धा नजरपुरेल तितके बघितले तरी पाणीच पाणी दिसते आणि याच मृतसाठ्यात छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याची तहान भागवल्या जाते. छत्रपती संभाजीनगर आणि जालण्याचा पाणीपुरवढा याच धरणावर अवलंबून आहे  नाथ सागर मध्ये तब्बल १०२ टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता आहे.

जायकवाडी धरणावरील वीज निर्मिती प्रकल्प आणि त्याची वैशिष्ट्ये

जायकवाडी धरणावर 12 मेगावॅट क्षमतेचा हैड्रो इलेक्ट्रिक जलविद्युत प्रकल्प  उभारलेला आहे. नदीच्या उजव्यातीरावर हा प्रकल्प बसवलेला आहे. यासाठी 12 मेगावॅट क्षमतेचे रिव्हर्सिबल व्हर्टिकल शाफ्ट फ्रान्सिस टर्बाइनसह बसवलेले आहे. या प्रकल्पाची खासियत अशी आहे कि वीज निर्मितीसाठी वापरलेले पाणी परत जलाशयात पाठवले जाते. यासाठी रिव्हर्सिबल हायड्रो टर्बाइन चा वापर करून हे पाणी परत  वापरून मुख्य जलाशयात पंप केले जाते.

Jayakwadi Dam

Jayakwadi Dam – पाण्याचा औद्योगिकी कारणासाठी उपयोग

हा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा, पैठण, बिडकीन आणि जालना औद्योगिक वसाहतीसुद्धा याच धरणावर अवलंबून आहेत. दररोज छत्रपती संभाजीनगर आणि जालना साठी 9000000 लिटर ( 90 Million Litters ) पाण्याचा औद्योगिकी कारणासाठी उपयोग होतो. त्यामुळे जायकवाडी धरण भरणं म्हणजे मराठवाड्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळणे असंही समजलं जातं.

जायकवाडी पक्षी अभयारण्य आणि इको सेन्सिटिव्ह झोन संरक्षित क्षेत्र

महाराष्ट्र राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने अशी अधिसूचना काढलेली आहे कि पक्षी अभयारण्य 141.05 चौ.कि.मी. क्षेत्र (बुडण्याच्या सर्व बाजूंनी 500 मीटर अंतरापर्यंत) इको सेन्सेटिव्ह झोन आहे. नाथसागर जलाशयात ५० हून अधिक माशांच्या जाती आहेत. अभयारण्य मध्ये 200 अधिक लोकल पक्षी व 70 हुन अधिक स्तलांतरित जातींचे परदेशी पक्षी अभयारण्यात बगायला मिळतात. ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान फ्लेमिंगो, स्पूनबिल, पॉइंटेड स्टॉर्क, नाईट हेरॉन, व्हाईट स्टॉर्क, वॅगटेल, पिनटेल, फावडे,ऑस्ट्रिया, सायबेरिया, नेपाळ, रशिया येथून सँडपायपर इत्यादी पक्ष्यांच्या जातींचे परदेशी पक्षी अभयारण्यात स्थलांतरित होतात. तसेच अनेक प्रकारचे साप धरण परिसरात आढळतात.

Jayakwadi Dam

Leave a Comment